11:07 PM पाउस .... माझा सखा


मंद पण गार वारा सुटलेला,
दिवस होता पण अंधारून आलेला

झाडांच्या पानांची कुजबुज सुरू झाली,
सगल्यानाच त्याची चाहूल लागली

सगळेच त्याची वाट पाहत होते,
मी ही त्याचीच वाट पाहत होते

कित्येक महिने झाले होते त्याला पाहून,
गेला होता मी येईन लवकर असे सांगून

मग यायला ईतका वेळ का लागला,
पाहता पाहता रस्ता मोकळा झाला

त्याचे टपोरे थेंब माझ्या अंगावर पडले,
बेदुन्द होऊन मी त्याच्यासवे न्हाहले

गेले विसरून त्याच्यसंगे ती जखम मनातली,
आली माझ्या चेहर्‍यावर नवीन झळाली

मनात आशेची एक पालवी फुटली
चेहर्‍यावर खळखळनारे हसू आले,

त्यानेच माझ्या आयुष्यात सुखद क्षण दिले
मलाही त्याने त्याच्यासारखेच बनविले

असा हा सगल्याना गोडी लावणारा
पाउस माझा सखा आला घेउनि रिमझिम धारा......
.
.
.
-उज्वला राउत
Join her On Orkut
Photobucket

11:05 PM ती एक वाट . . .


दिवस येत होते आणि जात होते,
आयुष्य पुढे - पुढे नेत होते

ज्या वाटेवरून आली होती चालत,
ती वाट एकांतात होतीखुणावत

पुन्हा मागे वळावे असे वाटत होते,
पण मागे वळता येत नव्हते

कधी - कधी वाटही चुकलेली,
म्हणूनच तर मोठी ठेच लागलेली

वाटेवरची काही झाडे सावली देणारी भेटली,
तर काही झाडे सावली होणारी भेटली

पण मी त्यांचेही आभार मानते,
त्यामुळेचमला सावली देणर्‍याची किंमत कळते

सोनेरी किरणांची सकाळ तिने दिली,
सूर्याची आन् चंद्राची लपाछपी तिने दाखवली

पावसाची ओढ तिनेच लावून दिली,
खूपकही देऊन आणि घेऊनही ती गेली

वाटेवरून चालून चालून थकली, दमली,
मग तिनेच पुन्हा नवीन वाट दाखविली

म्हणूनच म्हणते ती एक वाट.......

.
.
.
-उज्वला राउत
Join her On Orkut
Photobucket

10:43 PM मैत्रिण . . .


एक जीवाभावाची मैत्रीण असावी,
पण अर्ध्या रस्त्यात सोडून जाणारी नसावी

समजून घेणारी, जीवाला जीव देणारी,
पण विश्वासघात करणारी नसावी

सुखात सामील होणारी, दु:खात धीर देणारी,
पण स्वत:चा स्वार्थ साधणारी नसावी

केलेल्या चुका समजून सांगणारी-
वेळ प्रसंगी ओरडणारी,
पण चुकांवर पांघरूण घालणारी नसावी

थोडी मस्ती करणारी, लटकेच रागावणारी,
पण खरोखरच भांडनारी नसावी
संकटाना धैर्याने सामोरी जाणारी, त्याच्याशी लढणारी,
पण धीर सोडणारी नसावी
एक जीवाभावाची मैत्रीण असावी................

.
.
.
-महेश विशे
Join Him On Orkut
Photobucket

7:39 AM मी फक्त तुझीच . . .


कळत नकळत सगळ घडत होते,
आणि मी तुझ्यात गुंतत होते

चेहर्‍यावरचे हसू सुद्धा तूच,
आणि डोळ्यातले अश्रू सुद्धा तूच

जीवनाचे गाणे सुद्धा तूच,
आणि मनातले तरंग सुद्धा तूच

माझा श्‍वासही आहेस तूच,
आणि माझी रासही आहेस तूच

जीवनाला अर्थही आहेस तूच,
आणि जीवनातला पार्थही आहेस तूच

माझ्या जीवनाची दिशा ही तूच,
आणि माझ्या जगण्याची आशाही तूच

मी सुद्धा तुझीच आहे,
आणि फक्त तुझीच आहे...................
.
.
.
-उज्वला राउत
Join her On Orkut
Photobucket