12:32 AM > आता तरी हो म्हण...

नखरा तुझा किती अन
करतेस किती हा श्रृंगार...
तीर नजरेचा सोडूनी
करतेस मला असे घायाळ...
पायातले पैंजण तुझा
सुरैल तालावर नाचतात..
माझ्या पावलांना मग
त्याचे गुज ऎकू येतात ...
तुझी गालावरची खळी
कोड्यातच टाकते मला...
असचं असतं का रे?
अलगद उमलणनं तुझं माझ्या नाजूक फुला?
चेहरयावरी उडती तुषार ..
तव अंग चोरूनी घेतेस ..
वर्षाविहारात मात्र ..
चिंब ओली होऊन भिजतेस ...
रागवनं तुला अजिबात जमत नाही.
स्वार्थाला तर कुठे थाराच देत नाही..
सदा मदतीसाठी हात सरसावतेस..
दुबळ्यांना आधार एवढेच परम कर्तव्य मानतेस..
तु लाजताना मात्र
फक्त तुझ्याकडे बघणं होतं
तुझं ते मोहकं रुप पाहून
फक्त तुलाचं बघण्याच वेड लागतं..
एवढं सारं आहे तुझ्याकडे..
तरीही तुझे नयन काय शोधतात..
तुझ्याच प्रेमात पडलोय मी
असे सारे शब्द माझे मलाच ऐकू येतात..
आज मी तुला आवर्जून
माझ्या अंतकरणातला सांगत आहे..
माझ्या प्रेमाचं निवेदन
गुडघे टेकवून मांडत आहे..
आता तरी होकार दे ,
आणि काय हवयं मला?
येऊदेत प्रेमाची लाट..
अन तुझ्याच प्रेमसागरात एकरूप होऊदे मला...
.
.
.
.
.
-अपरिचित कवी
0 comments:
Post a Comment