9:44 AM ऋणानुबंध . . .

मीच माझ्या स्वप्नांना दिले आगीत होरपळून
पाहते जेव्हा मागे वळून राख फक्त उरलेली
माझ्या अश्रूंच्या पाण्याने भिजलेली

कधी मी तूझी होते आणि तू माझा
गुलाबी स्वप्नात रंगल्या होत्या तिन्हीसांजा

आयुष्याची वाट तुला माझ्याबरोबर चालायची होती
पण अर्ध्या वाटेवर मीच तुझी साथ सोडली होती

तूझ घायाळ मन तुझ्या डोळ्यातून वाहत होत
पण तुला काय ठाऊक तुझा प्रत्येक अश्रू माझ मन जाळत होत

तू पुढे गेलास पण माझा मार्गच बंद होता
तुझा नि माझा फक्त इतकाच ऋणानुबंध होता
.
.
.
.
-Meera
Join him On Orkut
Photobucket