2:29 AM नाते . . .
नात्यापलीकडचे नाते जपायचे असते
त्याकरिता शब्दांची गरज नसते
अशा निशब्द नात्यालाच मैत्री म्हणतात !!१!!
नात्यालाही एक अनाम अर्थ असतो
तो शोधायची गरज नसते
अचानक सापडलेल्या सुंदर भावनेलाच मैत्री म्हणतात !!२!!
कुणीतरी कुणाला तरी भेटते
एका क्षणात आपलेसे होते
त्या अकस्मात भेटीलाच मैत्री म्हणतात !!३!!
तुझी माझी अशीच मैत्री आहे
दुराव्यात ही जवलिकिची खात्री आहे.
ह्या विश्वासालाच मैत्री म्हणतात !!४!!
तुला हे सारे कलते तरी वलत नाही
कितीही नाही म्हटले तरी
तुझ्याशिवाय मला करमत नाही
अरे,या बैचैनिलाच तर मैत्री म्हणतात !!५!!
आता तरी तुला कलले ना मैत्री म्हणजे काय
की अजूनही काही बाकि आहे
अरे नाही नाही म्हणुन परत बोलण्यालाच मैत्री म्हणतात !!६!!
आता तरी माझ्याशी बोल
प्रेमाने नाही तर रागाने तरी बोल
या तरल रेशमी बंधनालाच मैत्री म्हणतात !!७!!
.
.
.
.
-Sadhana
Join him On Orkut
Subscribe to:
Post Comments (Atom)
Really 2 good ............
Meenakshi
khup mast kavita aahe
kup chaan aahey........
goood yaaar very nice.......
neha
very nice