4:44 AM व्यथा . . .

माझे मीपण तुला वाहिले
तुझ्या भोवती जीवन गुंफले
तुझ्याचसाठी दिनरात झुरले
परि तुला ना ते कळले.....

सर्वच तुझे सखे सोबती
मित्र मैत्रिणी तुझ्याभोवती
जळते मी माझ्या एकांती
परि तुला ना ते कळले.....

तुझेच गीत माझ्या ओठी
जीवन माझे तुझ्याच साठी
बांधिल्या मी रेशिमगाठी
परि तुला ना ते कळले.....

अबोल माझे नयन
घायाळ माझे मन
प्रेम माझे पावन
परि तुला ना ते कळले.....
.
.
.
.
-Meera
Join him On Orkut
Photobucket