11:59 PM केव्हातरी अचानक
केव्हातरी अचानक तूझे शब्द कानी पडती
अमृताहुनी गोड ते मला भासती
केव्हातरी अचानक तूझी भेट होई
विरहाचे दुःख सारे मन विसरून जाई
केव्हातरी अचानक तू अबोल होशी
एकटक डोळ्यात पाहत अंतरंगात विरून जाशी
केव्हातरी अचानक येती तूझ्या आठवणी
आणि ओलावून जाई माझी पापणी
.
.
.
.
-Meera
Join him On Orkut
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment