9:10 PM तुझ्या आठवणीचे बोल . . .

तुझ्याच काळजाचा तुकडा मी
दिलीस जन्म मला, दखविलेस सार जग,
शिकविलेस समाज्यात जगायला
दाखविलेस जगातील सारे रंग ....!!

झालोय मोठा, राहतोय सोडूनी तुला
कश्या ग विसरू ह्या मायेच्या आठवणी तुझ्या,
येते आठवण तुझी प्रत्येक क्षणा-क्षणाला
मायेन फिरवलेल्या हाताची,भरवलेल्या घासाची तुझ्या!!

आजही आठवण येतेच ग आई तुझी
असतो मी एकटा सोबतीला घेऊनी आठवणी तुझ्या,
आजही स्पर्शूनी जातात मला
अंगावर फिरलेला हात, केसात गुतंलेली बोटे तुझी ...!!

ते तर माझ स्वप्न असत
ह्याच स्वप्नात मला तुझ रूप दिसत,
मग माझा मीच हसतो अन् हसूनी
नकळत तुझ्या आठवणीने आसवे गाळतो ......!!

आसवे गाळत परत एक स्वप्न बघतोय
परत लहान व्हाव, तुझ्या खुशीत लाडान झोपावं,
अस होईल का ग आई ? आजही मला वाटत
तु मला लाडान खुशीत घ्याव अन् परत एकदा अंगाई गावं ....!!

कितीही मोठा झालो तरी तुझ्यासाठी लहानच आहे
येईन ग येईन मी परत आई,मनसोक्त खेळेन खुशीत तुझ्या,
तु घेशील मांडीवर मला अन् गाशील अंगाई
मी ऐकेण होऊनी बावरा, आसतील आसवे जोडीला माझ्या ....!!
.
.
.
.
-आनंद राजगोळे .
Join Him On Orkut
Photobucket