12:36 AM एक चुकलेली वाटचाल . . .

कधीतरी चालताना वाटलं....
कुणीतरी सोबत हवं होतं ...
सोबत मिळाल्यावर ..आयुष्य् हे सारं नवं होतं..

अचानक् ही सोबत तुटुन् गेली..
वाट पाहता पाहता नजर माझी मरुन गेली..

नशिबी आता एकटेच चालणे..
पावला-पावलावर मागे वळून पाहणे...

कुणास ठाउक ते सारे दिवस परत येतील..
ह्या भयाणा उन्हात ..थोडीतरी सावली देतील!!!!!!!

हे सारे सहन करताना ..मन माझे तडफडतेय......
खुप वेदना होउनही..काही होत नाही ...
असे दाखवणे फार अवघड जातेय...!!!

शेवटच्या वळणावर पावले माझी अडखळतील
येतय का कुणी..डोळे वाट पाहतील...

येणार नाही कुणी..तरी पण वाट पाहीन मी..
मरणानंतरही शोध घेत राहीन मी....
.
.
.
.
-शैलेश.
Join Him On Orkut
Photobucket