11:05 PM ती एक वाट . . .
दिवस येत होते आणि जात होते,
आयुष्य पुढे - पुढे नेत होते
ज्या वाटेवरून आली होती चालत,
ती वाट एकांतात होतीखुणावत
पुन्हा मागे वळावे असे वाटत होते,
पण मागे वळता येत नव्हते
कधी - कधी वाटही चुकलेली,
म्हणूनच तर मोठी ठेच लागलेली
वाटेवरची काही झाडे सावली देणारी भेटली,
तर काही झाडे सावली होणारी भेटली
पण मी त्यांचेही आभार मानते,
त्यामुळेचमला सावली देणर्याची किंमत कळते
सोनेरी किरणांची सकाळ तिने दिली,
सूर्याची आन् चंद्राची लपाछपी तिने दाखवली
पावसाची ओढ तिनेच लावून दिली,
खूपकही देऊन आणि घेऊनही ती गेली
वाटेवरून चालून चालून थकली, दमली,
मग तिनेच पुन्हा नवीन वाट दाखविली
म्हणूनच म्हणते ती एक वाट.......
.
.
.
-उज्वला राउत
Join her On Orkut
Subscribe to:
Post Comments (Atom)
Khoop Chan Aahi kaveta ge mala khoop aawade ler e
For More Details Regarding This visit http://www.becaution.com
ya mala chan vatalya kavita aani tumhihi visit dya